Wednesday, November 5, 2014

कूप मंडूक

आपल्या सगळ्यांना कूप मंडूक हि गोष्ट माहित आहेच .. कि कसा एकाच विहिरीत राहून बेडकाला आस वाटू लागल कि हि विहीर म्हणजेच पूर्ण जग आहे. विहिरीतून दिसणार आकाश म्हणजेच एवढाच विश्व आहे. त्यांनी कधी पर्यंत केला नाही त्या विहिरीतून वर येवून बघायचा, एकदा एक कासव तिथे आल त्यांनी त्यला विचारलं अरे तू इथे काय बसून राहिलास वर ये आणि बघ समुद्र किती मोठा आहे पण बेडकाला डोक्यात कायम असत कि नाही आस काही नाहीच आहे हेच जग आहे ..आणि तो कासवाला वेड्यात काढत
असा जीवनात विचार करणारी खूप लोक असतात ज्यांनी स्वताच एक जग ठरवलेले असत आणि त्यांना त्यातून बाहेरच यायचं नसत , त्यांनीच त्याच्या सीमा ठरवलेल्या असतात आणि ते त्यातच रहात असतात, त्यांच्यात एक अहंकार असतो कि मला कोणाची गरज नाही मी माझा एकटाच एकटीच मस्त आहे.. काय लोकांशी ओळख करायची उगाचच .. ह्या लोकांना कोणी मित्र या मैत्रिणी नसतात ..हे लोक कधीच सोशल होत नाहीत म्हणजे त्यांना ते जमत नाही. रादर ते ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मूर्खपणाच्या वाटतात. असा करणारे लोक हे किती मूर्ख असतात असा काहीच गैरसमज करून हे लोक असाच जगत राहतात.
मला एवदाच मांडायचं कि हे जग खूप छान आहे आणि हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळत. आस ते फुकट घालवू नका .. जगा दुसर्यांना जगू द्या, मस्त सोशल व्हा, जीवनाचा आनंद लुटा. माणूस जेव्हा सोशल होतो न विचारांची देवाण घेवाण होते जे आपल्याला बराच काही शिकवून जाते, आयुष्यात पुढे जावून आस नको वाटायला कि अर्रे हे तर मी करू शकत होते का नाही केल ? माझ्या कडे तर तेव्हा वेळ होता पण आता नाहीये कारण वेळ हि कोणासाठीच थांबत नसते .. वेळ एकदा गेली कि गेली...
कोणाला तरी मिस करताय मग फोन करा ..
कोणाला तरी भेटावस वाटतंय .. त्याला बोलावून घ्या ...
स्वताला कोणीतरी समजून घ्यावास वाटतंय .. समजावून सांगा
प्रश्न आहेत, ऊतर हवय .. विचारा
काही गोष्टी आवडल्या नाहीयेत .. बोलून दाखवा
कुणाच काहीतरी आवडलाय .. अप्रीशियेत करा
कुणावर तरी खूप प्रेम करताय .. मग एकदा तरी नक्की बोलून बघा ..
बघा तरी हे करून ... मित्र/ मात्रिणी बनवा, स्वताला वेळ द्या, दुसर्यंची बेडी बनू नका, स्वत जागा .. दुसर्याला जगू द्या, आनंद द्या आणि मग घ्याही ..नवीन गोष्टी करायचा प्रयत्न करा .. मला एखादी गोष्ट का जमत नाहीये हे ह्याचा विचार करा आणि ती करायचा एक तरी प्रयत्न करा .. सगळ्यात महत्त्वाच स्वतावर खूप प्रेम करा ..
आणि कूप मंडूक प्रवृत्तीतून बाहेर पडा ...

No comments:

Post a Comment